आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polluted Water In Pimpalgaon Peth, Sillod, News In Marathi

आली रोगराई: पिंपळगाव पेठ गाव रुग्णशय्येवर; अर्धे गाव आजारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणिकनगर- सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावाला दूषित पाण्याचे वेढले असून यामुळे अर्ध्याहून अधिक ग्रामस्थांना विविध आजारांची लागण झाली आहे. सोमवारी आरोग्य विभागान चारशे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. यातील 12 रुग्ण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपासून दूषित पाण्यामुळे अख्खे गाव त्रस्त आहे. पाणीपुरवठा करणारे नळ आणि गटारी एकत्र वाहत असल्याने या ठिकाणी अनेकांना जुलाब, पोटदुखी, ताप, उलट्या तसेच अशक्तपणा जाणवत आहे. हे रुग्ण स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु रुग्णालयात पुरेशी जागा नसल्याने सोमवारी सकाळी रुग्णांनी संताप व्यक्त केला. याची आरोग्य विभागाला माहिती मिळताच अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात दाखल झाले. या पथकाने दिवसभरात चारशेहून अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले.

पुढील स्लाईड्‍सवर पाहा गावातील अवस्था....