आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतींची सायकलस्वारी, तर तहसीलदार पायीच ऑन ड्यूटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- दिल्लीत आप सरकारने प्रदूषणमुक्तीसाठी एक दिवस दुचाकी, चारचाकी वाहने चालवता जसा पर्यावरणाचा समतोल राखला, अगदी त्याचप्रमाणे माजलगावसारख्या छोट्या शहरात शुक्रवारी दिवसभर राजकीय नेत्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वच पायी चालले. शिवसेनेने राबवलेल्या एक दिवस वाहनमुक्तीच्या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी पेट्रोल बचतीचा नारा दिला.

माजलगाव शहरात वाहतुकीची वाढती कोंडी, वाहनांसाठी होणारा इंधनाचा मोठा वापर त्यामुळे होणारे प्रदूषण हा प्रकार माजलगावकरांना खटकला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ज्याप्रमाणे वाहनमुक्त अभियान राबवत पायी चालणे सायकलचा वापर करण्याची जी हाक दिली, त्यास दिल्लीकरांनी प्रतिसाद देत अभियान यशस्वी केले होते. याच आंदोलनाचा भाग म्हणून माजलगावसारख्या छोट्या शहरात वाहनमुक्त अभियान राबवण्यासाठी शिवसेनेचे डॉ. उद्धव नाईकनवरे यांनी पुढाकार घेतला. त्याप्रमाणे शहरात शुक्रवारी दिवसभर वाहनमुक्त अभियान राबवले. शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून प्रत्येक कुटुंबामध्ये दोन ते तीन दुचाकी काही प्रमाणात चार चाकी गाड्यांची संख्या वाढली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, बँका, मल्टिस्टेट, पतसंस्था, मेडीकल असोसिएशन, वकील संघ, व्यापारी महासंघ यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊ त्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमाला माजलगाव शहरात सर्वस्तरांतून प्रतिसाद मिळाला. या मोहिमेसाठी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. डॉ. उद्धव नाईकनवरे यांच्यासह दिगंबर सोळंके, भारत शिनगारे, प्रल्हाद सोळंके, अमोल डाके, सुनील खंडागळे, सतीश बोठे, उत्तमराव झाटे, अतुल उगले या शिवसैनिकांनी नागरिकांना पायी चालण्याचे आवाहन केले. येथील तहसीलदार डॉ. अरुण जराड हेही उपक्रमात सहभागी होऊन पायी तहसील कार्यालयात गेले. बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे हे सायकलचा वापर करून बाजार समितीत गेले. माजी नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके, भाजप नेते अरुण राऊत, मंगलनाथ मल्टिस्टेटचे व्यवस्थापक रवींद्र कानडे यांनी सायकल पायी चालत अभियानात सहभाग घेतला.

१२,000 लि. डिझेल,५००० लि. पेट्राेल लागते
५०,००० दुचाकींची शहरातील संख्या
४,००० चारचाकी वाहने लोकांकडे
४९,७०० शहराची लोकसंख्या

अशा अभियानाची गरज
राबवण्यातआलेले वाहनमुक्त अभियान स्तुत्य असून हे अभियान महिन्यातून एक दिवस राबवणे गरजेचे आहे. त्यामुळे इंधनाची बचत तर होणारच असून प्रदूषणात घट होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल.’’
-डॉ.अरुण जराड, तहसीलदार, माजलगाव.

वाहन कमी वापरा
वाहनांच्याअतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून ध्वनी प्रदूषण अाणि वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वाहनांचा कमी वापर करण्याची आवश्यकता आहे. ’’
- डॉ.उद्धव नाईकनवरे, शिवसेना युवा कार्यकर्ते
तहसीलदार पायीच ड्यूटीला.