आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचे फेक अकाऊंट बनवून अपलोड केले अश्लील फोटो; कुरुंदा ठाण्यात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- विभक्त होऊन माहेरी राहणाऱ्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून अश्लील चित्र व संदेश टाकून बदनामी करणाऱ्या पतीविरूद्ध पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
कुरूंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोणवाडा येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता.
 
पती नांदवत नसल्यामुळे ती माहेरी राहत होती. सात महिन्यांपूर्वी गणेशने पत्नीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. त्यावर त्याने अश्लील चित्र व घाणेरडे संदेश टाकून पत्नीची बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी महिला ही परभणी येथे शिक्षण घेत असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा बदनामी केली.  एवढ्यावरच न थांबता गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाइलवरही  अश्लील संदेश पाठवण्यास  सुरुवात केली. या प्रकाराला त्रस्त होऊन शेवटी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी गणेश लिंगुराम मुंगावकर याच्याविरूद्ध सायबर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण आरोपीच्या गावाच्या हद्दीतील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...