आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोस्ट कार्यालयात रांगेत उभे न राहता अपंगांना दिल्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलूू - सेलू येथील टपाल कार्यालयात अपंगांना प्राधान्य देऊन त्यांना नोटा बदलून देण्याचे काम करण्यात आले. टपाल कार्यालयातही रांगा लागत असताना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अपंगांची गैरसोय होऊ नये यासाठी पुढाकार घेऊन त्यांना प्राधान्य देत नोटा बदलून दिल्या.
सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्या बदलून घेण्यासाठी नागरिक एकच गर्दी करत आहेत. यामुळे लांबच लांब रांगा लागल्या. पोलिस संरक्षणात पोस्ट ऑफिसचे कर्मचारी नोटा बदलून देत आहेत, परंतु यामध्ये अपंगत्व आलेल्या नागरिकांना या रांगेत उभे राहणे शक्य नसते. याचे कोठेतरी सामाजिक भान ठेवून सेलू पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर शेख इर्शाद व उपपोस्टमास्तर मास्तर भागवत इंगोले व कर्मचारी यांनी कोठेतरी सामाजिक बांधिलकी म्हणून अपंगांना रांगेत न लागता नवीन नोटा बदलून दिल्या.

यामुळे अपंगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमाला पोस्ट कार्यालयातील उपपोस्टमास्तर गणेश नलगे, शाखा पोस्टमास्तर उद्धवराव बोराडे, भागवत लिखे, बळीराम काळे, यशवंत वाईकर, पोस्टमन संजय वीर, श्रीमंत मुंढेंसह इतर कर्मचारी उपस्थित होते. असाच उपक्रम बँक व इतर पोस्ट कार्यालयातून वयोवृद्ध नागरिकांना मिळाला हवा, अशी मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...