आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ कारणावरून वडगावात दोन गटांत तुंबळ हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड : किरकोळ कारणावरून पारधी समाजातील दोन गटांत लाठ्या-काठ्या,कुऱ्हाडीसह कोयत्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.
फिर्यादी मत्ताबाई नद्या चव्हाण (३२, रा. सालवडगाव) व तिचा पती नंद्या चव्हाण हे दोघे ५ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी असताना आरोपी चांद्या नब्या भोसले, याशिन रेहमान चव्हाण, भैया रेहमान चव्हाण, रेहमान चव्हाण, बापू रेहमान चव्हाण, आता रेहमान चव्हाण, अंध्या रेहमान चव्हाण, कृष्णा रेहमान चव्हाण,सोन्या मजल्या भोसले (रा.खंडाळा) तर रिजवान भोसले हा पडेगाव (औरंगाबाद) येथील रहिवासी आहे.
मताबाई चव्हाण व तीचा पती नंद्या चव्हाण यांना घरात घुसून लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याने हाणामारी सुरू केली. यात पती- पत्नी जखमी झाले. याप्रकरणी पाचोड पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सर्व आरोपी फरार झाले होते.

याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश आंधळे, फौजदार नामदेव मद्दे, भगवान धांडे,
गोरखनाथ कणसे, नरेंद्र आंधारे आदी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...