आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य निर्वाह निधीतून कर्मचा-यांना लाखोंचे वाटप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - महापालिकेच्या वार्षिक लेखा परीक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीला आल्या आहेत. कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात शिल्लक जमा नसतानाही 68 कर्मचाºयांना 29 लाख 82 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिकेतील 102 कर्मचाºयांना 89 लाख 75 हजार रुपयांची रक्कम अग्रीम म्हणून देण्यात आली. त्याचे समायोजन वर्षअखेरीस करण्यात आलेले नाही.
महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षणाचा अहवाल 26 जूनला स्थायी समितीला सादर केला. या लेखा परीक्षण अहवालाने महापालिकेतील अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. भविष्य निर्वाह निधीबाबत या अहवालात चांगलेच ताशेरे ओढण्यात आले आहेत. महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहिता 1971 चे नियम 134 चे उपनियम 3 प्रमाणे नमुना क्रमांक 98 प्रमाणे खातेवही व नमुना क्रमांक 99 प्रमाणे वसुली नोंदवहीत नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तसेच 134 (2) प्रमाणे प्रत्येक कर्मचाºयाला 31 मार्चअखेरची भविष्य निर्वाह निधीची चिठ्ठी व्याजाची परिगणना करून दिली पाहिजे. अशी कार्यवाही करण्यात आलेली नाही. भविष्य निर्वाह निधीतील कर्मचाºयांच्या जमा रकमा तपासल्या असता त्यात 68 कर्मचाºयांच्या खाती जमा नसतानादेखील अग्रीम जास्त दिले असल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम 29 लाख 82 हजार एवढी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सर्व लेखा परीक्षण चुकीचे - लेखा परीक्षणात असे आक्षेप घेण्यात येतच असतात. त्यात काही विशेष नाही. महापालिकेत सर्व रेकॉर्ड व्यवस्थित आहे. लेखा परीक्षणात म्हटल्याप्रमाणे काहीही झालेले नाही. भविष्य निर्वाह निधीच्या अग्रीम रकमा योग्यरीत्या देण्यात आल्या. कर्मचाºयांच्या खात्यात जमाही आहे. लेखा परीक्षण करताना ते दाखवले गेले नसल्याची शक्यता आहे. परंतु अहवालात म्हटल्याप्रमाणे काही नाही.- पी. पी. बंकलवाड, मुख्य लेखाधिकारी, महानगरपालिका, नांदेड