आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजन कुटुंबाचा वडिलोपार्जित जमिनीचा वाद; मंगळवारी तडजोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - येथील महाजन कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचे प्रकरण मध्यस्थ न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. ते मिटवण्यासाठी महाजन कुटुंबातील सर्वांना 22 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे सांगितले आहे.

भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टला दान दिलेल्या उस्मानाबादमधील वडिलोपार्जित 3 एकर 14 गुंठे जमिनीतील वारसहक्काप्रमाणे हिस्सा मिळावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली. त्यानंतर प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी यांनीही जमीन मिळावी यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. प्रकाश महाजन यांना जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात, तर सारंगी यांना उपविभागीय दंडाधिकारी, दिवाणी न्यायालयात न्याय मिळाला. सारंगी यांना उस्मानाबादच्या दिवाणी न्यायालयाने जुलै 2012 मध्ये दिलेल्या निकालावर तपस्वी ट्रस्टने जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपिलावर शनिवारी सुनावणी झाली. त्यासाठी सारंगी उपस्थित होत्या. प्रतिष्ठित कुटुंबातील हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायाधीश मुकुंद दाते यांनी सामोपचाराने मिटवण्यासाठी मध्यस्थ न्यायालयाकडे सोपवले. त्यासाठी संपूर्ण महाजन कुटुंब, प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, प्रतिभा भातंब्रेकर यांच्यासह वादी, प्रतिवादींना तडजोडीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे सांगितले आहे.