आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने तासभर ठेवली बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने एका धर्माच्या भावना दुखावल्यामुळे लासूर स्टेशन येथे व्यापाऱ्यांनी तासभर आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून गुरुवारी  सर्वधर्मीयांच्या वतीने निषेध करण्यात आला.  
 
याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या सागर गुजरला मंगळवारी रात्रीच ताब्यात घेतले असून  बुधवारी शिल्लेगाव पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सूर्यकांत कोकणे अधिक तपास करीत आहेत.  
 
या घटनेमुळे लासूर स्टेशन येथे बुधवारी सकाळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यात सर्वधर्मीय बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवत यातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, असे निवेदन पोलिसांना दिले. यानंतर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य संपत छाजेड, भाऊसाहेब गाडेकर, संतोष पाटील, सुभाष नरोडे, बाबासाहेब सोमासे, जयदेव जाधव, उपसरपंच गणेश व्यवहारे, नवाबभाई सय्यद, महेमूदभाई भारतवाला, इस्माईलभाई, दोन्ही मशिदींचे मौलाना आदींसह ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन शांततेचे आवाहन करीत लासूर स्टेशन येथील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करताच तासभर दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी उतस्फूर्त प्रतिसाद दिला.
 
त्यानंतर दुपारून सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले. दरम्यानख् शिल्लेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बरडे, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, फौजदार संदीप काळे आणि दंगा काबू पथक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिवसभर शहरात तळ ठोकून होते.
बातम्या आणखी आहेत...