पाचोड- तीन दिवसांपासून पावसासाठी सुरू असलेल्या विशेष नमाजची शनिवारी दुआने सांगता झाली. जूनमध्ये दोन दिवसच मृगाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सुमारे दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. पाचोडसह परिसरात मुस्लिम बांधवांनी पावसासाठी तीन दिवसांच्या विशेष नमाजचे आयोजन केले होते. गावापासून दोन किलोमीटर दूरवर अनवाणी जाऊन परिसरातील हजारो बांधवांनी सहभाग नोंदवला. दररोज दीड तास विशेष नमाज अदा करण्यात आली. या तीनदिवसीय नमाजची शनिवारी सांगता झाली. या वेळी मौलाना हाफिज आसेफ यांनी दुआ केली.