आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्जावाढ शिक्षकांसाठी ठरतेय गोतास काळ; सहशिक्षकांना पदवीधरचा दर्जा देण्यामुळे नवीन पेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक सहशिक्षकांना पदवीधर शिक्षकांचा दर्जा दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आठवी ते दहावीच्या वर्गाला शिकवणारे 60 माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता 56 माध्यमिक शाळेत असे शिक्षक दिले जाणार का ? असा प्रश्न आहे.

जिल्ह्यात माध्यमिक शाळांची संख्या 56 च्या आसपास आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्येवर शिक्षकाची संख्या अवलंबून असते. माध्यमिक शिक्षकांची संख्या 300 च्या आसपास आहे. जिल्हा परिषदेने शासनाच्या धोरणानुसार बाराशेंपैकी एक हजार सहशिक्षकांना पदवीधरचा दर्जा दिला. त्यामुळे इयता आठवी वर्गाचे 60 माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. अशा शिक्षकांचे नववी आणि दहावीच्या वर्गांवर समायोजन करण्यात येणार आहे.

प्रत्येक माध्यमिक शाळेवर तुकड्यांच्या संख्येनुसार गणित, इंग्रजी, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गरज असते. मात्र माध्यमिक शिक्षकांची अद्याप भरतीच झालेली नसल्याने अनेक शाळांमध्ये या विषयाचे शिक्षकच नाहीत. भविष्यात जर अशा माध्यमिक शाळेत शिक्षक दिले नाही तर या शाळा बंद होण्याचाही धोका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. एकीकडे माध्यमिक शिक्षकांचे मागील पाच वर्षांपासून समायोजन करण्याबाबत शिक्षणाधिकार्‍यांनी कुठलाच निर्णय घेतलेला नाही. हा प्रश्न कायम असताना प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदाचा दर्जावाढ, त्यांचे समायोजन करण्याबाबत शासनाने परिपत्रक जारी करताच जिल्हा परिषदेने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे समायोजन कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. याचा पाठपुरावाही शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे करायला तयार नाहीत. गेवराई तालुक्यातील चकलांबा माध्यमिक शाळेत तब्बल सहा शिक्षक कमी आहेत.

तलवाडा, चौसाळा, वाघे बाभूळगाव या तीन ठिकाणी गणिताचे शिक्षक नाहीत तर आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील माध्यमिक शाळेत पाचपैकी केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत असून यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.
पदवीधरांना नियुक्ती नाही
४दर्जावाढ झालेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांना 56 माध्यमिक शाळेत नियुक्ती दिली जाणार नाही. याबाबत शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे यांना तशा प्रकारच्या सूचना देणार आहे.’’
राजीव जवळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड.
दर्जा वाढलेले शिक्षक नकोत
आरटीईच्या कायद्यानुसार आठवीच्या वर्गाला शिकवणारे माध्यमिक शिक्षक हे बीएबीएड व बीएस्सीबीएड आहेत. त्यांना आठवी इयत्तेवर कार्यरत समजण्यात येऊन सहावी व सातवी इयत्तेवर प्राथमिक शिक्षकांना दर्जावाढ देण्यात यावी. म्हणजे माध्यमिक शिक्षकही अतिरिक्त होणार नाहीत. या मागणीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक कृती समितीचे आदिनाथ सवासे, कांतीलाल लाड ,पी. एस. पंडित, महेश राजूकर, एम. झेड. खतीब यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्याकडे धाव घेत माध्यमिक शाळेवर दर्जावाढ शिक्षक देण्यात येऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
माध्यमिक शिक्षकांचे समायोजन कधी ?
प्राथमिक शिक्षकांचे समायोजन गुरुवारपासून सुरू झाले असले तरी पाच वर्षांपासून माध्यमिक शिक्षकांचे समायोजनच करण्यात आले नाही. यापूर्वी प्राथमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी अशा शिक्षकांचे समायोजन केले होते. त्यानंतर आलेल्या कोणत्याच प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात आले नाही.