आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेचा प्रारंभ; नांदेडहून मुंबई, हैदराबाद विमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेचा प्रारंभ २७ एप्रिल रोजी सकाळी ११. १५ वाजता नांदेड येथून होत आहे. या कार्यक्रमास ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अशोक चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, महापौर शैलजा स्वामी उपस्थित राहणार आहेत. उडाण योजनेअंतर्गत नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून ट्रू जेट ही विमान कंपनी मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. उडाण या योजनेचे उद्घाटन व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...