आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modis Decision About Latur Water Train

पीएम मोदींमुळेच आली लातूरात पाण्याची रेल्वे, नायडूंच्या ट्विटमुळे उलगडले सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूरला रेल्वेने पाणी देण्याचा निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच घेतला होता. त्यांनी मांडलेल्या कल्पनेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सत्यात उतरवले, असे ट्विट केंद्रीय ग्रामविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी सोमवारी केले. विशेष म्हणजे ‘दिव्य मराठी’ने पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाने लातूरला कोणत्या दिवशी आणि किती वाजता पाण्याची रेल्वे पोहोचेल हे ठरवून दिले होते यासंबंधीचे वृत्त पंधरा दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते.

लातूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर माध्यमातून त्याची चर्चा झडत होती. त्याची गंभीर दखल घेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरला रेल्वेने पाणी देता येईल काय? याची चाचपणी करण्याची सूचना मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना दिल्या होत्या. राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर टाकली होती, तर सुरेश प्रभूंनी देशभरातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाण्याचे टँकर असलेली रेल्वे कोठे उपलब्ध आहे? आणि लातूरला कोठून पाणी देता येईल याची चाचपणी करण्याचे आदेश दिले होते. चारच दिवसांत राजस्थानातील कोटामधून पहिली गाडी मिरजेकडे रवाना झाली. राज्य आणि केंद्राचे अधिकारी एकाच वेळी रात्रंदिवस कामाला लागले आणि पाचव्या दिवशी पहिली रेल्वे पाणी घेऊन लातूरला पोहोचली. मात्र, यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याची साधी कुणकुणही लागू देण्यात आली नाही.
पुढीस स्लाइड्सवर वाचा व्यंय्यांनी काय केले आहे ट्विट, आणि पाहा ‘दिव्य मराठी’ने दिले होते पीएमओ पाठपुराव्याचे वृत्त