आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priority To Local Youths In Central Police Force Home Minister

केंद्रीय पोलिस दलात स्थानिक तरुणांनाच प्राधान्य - गृहमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - कमी वेतन, मुलाबाळांपासून दूर परराज्यात जाऊन राहणे आदी अडचणींमुळे आता नव्याने स्थापन होणार्‍या केंद्रीय पोलिस दलाच्या केंद्रांच्या भरतीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी देण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी केली. कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे स्थापन झालेल्या सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिला समारंभप्रसंगी ते बोलत होते.
येलकी येथे 77 एकर जमिनीवर 1200 राखीव जवानांसाठी सशस्त्र सीमा बलच्या प्रशिक्षण केंद्राची कोनशिला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता स्थापन झाली. या वेळी गृहमंत्री शिंदे म्हणाले की, एसएसबीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यांत वाहिनी सुरू करण्यात आली आहे. गृहमंत्रालयांतर्गत येत असलेल्या एसएसबी, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफसारखे सात केंद्रीय अर्धसैनिक पोलिस दल कार्यरत असून त्यांची प्रशिक्षण केंद्रे संपूर्ण देशभर स्थापन करण्यात येणार आहेत. या दलातील पोलिसांना सेवेत असताना व निवृत्तीनंतरही सैन्याप्रमाणेच सोयी-सुविधा देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.
शिंदे म्हणाले, एसएसबीच्या जवानांची गनिमी काव्याने युद्ध करण्यात ख्याती आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो, त्या शिवाजी महाराजांनीही याच पद्धतीने युद्धे जिंकली असून हे दल महाराष्ट्रात स्थापन होत असल्याने मला आनंद झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड, आमदार राजीव सातव, आमदार माधव पाटील, आमदार भाऊ पाटील, आमदार विजय खडसे, एसएसबीचे उपमहानिरीक्षक भानू उपाध्याय, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर कळमनुरी येथे नवीन तहसील कार्यालय आणि मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
येलकी येथे 77 एकर जमिनीवर 1200 राखीव जवानांसाठी सशस्त्र सीमा बलच्या प्रशिक्षण केंद्राची कोनशिला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता स्थापन झाली. या वेळी गृहमंत्री शिंदे म्हणाले की, एसएसबीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यांत वाहिनी सुरू करण्यात आली आहे. गृहमंत्रालयांतर्गत येत असलेल्या एसएसबी, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफसारखे सात केंद्रीय अर्धसैनिक पोलिस दल कार्यरत असून त्यांची प्रशिक्षण केंद्रे संपूर्ण देशभर स्थापन करण्यात येणार आहेत. या दलातील पोलिसांना सेवेत असताना व निवृत्तीनंतरही सैन्याप्रमाणेच सोयी-सुविधा देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.
प्रारंभ । कळमनुरी तालुक्यात राखीव जवानांसाठी सशस्त्र सीमा बलाच्या प्रशिक्षण केंद्राची कोनशिला स्थापन
राजीव सातव यांच्या शिफारशीची गरज आम्हालाच : शिंदे
आमदार राजीव सातव यांनी आघाडीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जागा सोडवून घेऊन हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राजीव सातव यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे पाहता त्यांना खासदार करणे गरजेचे आहे. महसूलमंत्री थोरात म्हणाले की, सातव यांना दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. गृहमंत्री शिंदे म्हणाले की, सातव यांना माझ्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर राहुल गांधी यांच्या जवळिकीमुळे ते एवढे मोठे आहेत की, आम्हालाच त्यांच्या शिफारशीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, असेही शिंदे यांनी नमूद केले. यामुळे राजीव सातव हे काँग्रेसकडून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.