आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pritam Khade Daughter Of Munde To Contest Loksabha Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची डॉक्टर कन्या, वडिलांच्या मृत्यूनंतर केला राजकारणात प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - प्रीतम खाडे

बीड - भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दुसरी कन्या बीडमधून प्रीतम लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे. त्यांनी मंगळवारी परळी या आपल्या मतदारसंघातूनच प्रचाराचा शुभारंभ केला. 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीबरोबरच बीडमधील लोकसभेच्या जागेसाठीही मतदान होणार आहे.
यापूर्वीपर्यंत या जागेवरून विद्यमान आमदार पंकजा पालवे-मुंडे लढणार असल्याची चर्चा सुरू होती. पण पंकजा यांनी संघर्ष यात्रा काढली आणि राज्यातील राजकारणातच सक्रिय राहण्याचा मानस स्पष्ट केला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमधून होणा-या लोकसभा निवडणुकीत मुंडे कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास आपला पक्ष उमेदवार देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या जागेवर प्रीतम मुंडे यांचा विजय निश्चितच मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस यांना पराभूत करत विजय मिळवला होता.


कोण आहेत प्रितम?
प्रीतम खाडे या गोपीनाथ मुंडेंच्या दुस-या कन्या आहेत. त्या पेशाने डॉक्टर आहे. मुंडेंच्या निधनानंतर लोकसभेच्या या जागेसाठी त्या प्रबळ दावेदार बनल्या आहेत. प्रितम यांची राजकारणात सक्रिय होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी त्या मुंडे साहेबांबरोबर त्यांच्या राजकीय कार्यक्रमात सहभाग होत असत. पण आता प्रत्यक्षपणे स्वतः राजकारणात उतरणार आहेत.
प्रीतम यांचा रॉयल विवाह
2009 मध्ये प्रितम यांचा डॉक्टर गौरव खाडे यांच्याबरोबर विवाह झाला होता. पुण्यात झालेल्या या विवाह सोहळ्यात भाजपासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. प्रितम यांचे पती गौरव हेही डॉक्टर असून, ते सध्या अमेरिकेत प्रॅख्टीस करतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा प्रितम यांचे PHOTO