आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा शाळा बेमुदत बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - खासगी संस्थाचालकांच्या विविध मागण्यांवर शासनाने 14 जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास 16 जुलैपासून बेमुदत बंद पुकारण्याच्या जिल्ह्यातील संस्थाचालकांनी निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात ही बैठक झाली. याप्रसंगी जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्था चालकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
या वेळी ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब बायस, कै.नागोराव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव सतकर, सत्यदीप महिला मंडळाच्या अध्यक्षा विमल आगलावे, शिक्षण संस्था चालकांच्या या बैठकीत संस्था चालकांबरोबर चर्चा करण्यासाठी बेग मन्सूर अली खान यांनी येत असलेल्या अडी अडचणी, शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न, शासनाकडून विविध निर्णयाच्या माध्यमातून संस्था चालकांची सुरू असलेली कोंडी आणि शिक्षण संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सस्थाचालकांची संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळ या नावे स्थापन करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अध्यक्ष बाबासाहेब बायस, महासचिव राजकुंवर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवानसिंह डोभाळ, उपाध्यक्ष बाबूराव सतकर, साहेबराव खरात, सचिव रवींद्र तौर, कोशाध्यक्ष गणेश अग्रवाल, सदस्य भूपेंद्र शहा, संजय गौतम, दत्तात्र्यय ठवळे,उषा देशपांडे, संगीता राजपूत, भारत काळबांडे, अँड तुषार गवळी, प्रा. रामेश्वर गवळी आदींची निवड करण्यात आली.या वेळी नंदकिशोर माळशिखरे, पुरुषोत्तम वायाळ, विमल अगलावे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सस्थाचालकांची उपस्थिती होती.
या आहेत जाचक अटी - राज्य शासनाने खासगी अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुदान सन 2004पासून बंद केले आहे. त्यामुळे वीज, पाणी, इमारत दुरुस्ती, प्रसाधनगृहे, क्रीडांगण, संगणक साहित्य आणि इतर भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना देणे शक्य नाही. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या भरतीवर बंदी आणली आहे. यामुळे शिक्षण संस्थाचालकांना खर्च करणे अडचणीचे ठरते आहे.