आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बोअर घेण्यास आष्टी तालुक्यात बंदी; जिल्हाधिकारी केंद्रेकर यांचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- तालुक्यातील पर्जन्यमान अत्यल्प असल्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी तालुक्यात खासगी बोअर घेण्यास बंदी घातली आहे.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेनुसार पाण्याची पातळी 4.38 मीटरने घटली आहे. तालुक्यात पाचशे ते सातशे फूट खोलवर पाण्यासाठी बोअर घेण्याची अनिष्ट प्रथा पडू लागली आहे. त्यामुळे भूगर्भामध्ये हवेचा अतिरिक्त भार होऊन एखादी अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे बोअर घेण्यावरच बंदी घातली पाहिजे, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या गंभीर विषयाबाबत लक्ष वेधले असता जिल्हाधिकाºयांनी सर्व ठिकाणच्या खासगी बोअर घेण्यावर बंदी घातली असून सर्व रिंग मशीन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मशीन जप्त करणार
''बोअर घेण्याला बंदी असल्याचे 18 फेब्रुवारी 2013 च्या पत्रान्वये आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्व तलाठी, मंडळ अधिकाºयांना खासगी रिंग मशीन जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत.''
-अरविंद बोळंगे, नायब तहसीलदार, आष्टी