आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमालाला हमीभाव, दारूमुक्ती गाव ; जाहीरनामा , संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद : शेतीमालाला हमीभाव, दारूमुक्ती गाव आणि विद्यार्थ्यांना सर्वप्रकारचे शिक्षण मोफत देणे आदींसाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड यांनी दिली. जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १३) पत्रपरिषदेत गायकवाड बोलत होते.

या वेळी मराठा सेवा संघाचे अॅड. तानाजी चौधरी, जिल्हा सचिव सिद्धेश्वर जाधव, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कवडे, अनिल जाधव, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजी सुरवसे, जिल्हा सहसचिव विकास गडकर आदी उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, संघटनेला राजकीय पक्ष म्हणून समाज स्वीकारणार आहे. यामुळे राजकारणातही यश मिळेल,
अशी आशा बाळगून जिल्ह्यातील सर्व गट व गणांमध्ये उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे. यापैकी किमान पाच गट, तर १५ गणांमध्ये उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे. समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सत्तेची चावी हातात गरजेचे असल्यानेेच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
सर्व जातींचे उमेदवार
संभाजी ब्रिगेडकडून सर्व जातींच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार आहे. यासाठी न्यायालय, शिक्षण, प्रशासनात काम केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना निरीक्षक म्हणून निवडण्यात येणार आहे. निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार असून प्रत्येक तालुक्यात ३०० कार्यकर्त्यांची फळी तयार केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...