आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डांगे यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - संत साहित्याचे अभ्यासक व राज्य सरकारच्या मराठी शब्दकोशाचे प्रमुख संपादक प्राचार्य रामदास डांगे (78) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर परभणीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजात 1961 मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या डांगे यांनी परभणीतील शिवाजी कॉलेजच्या प्राचार्यपदी 12 वर्षे, गंगाखेडच्या संत जनाबाई कॉलेजात 11 वर्षे आणि परभणीच्या नूतन महिला कॉलेजात 10 वर्षे प्राचार्य म्हणून कार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, सुनील, राजेंद्र व प्रशांत ही मुले, मुलगी, सुना व नातवंडे आहेत.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)