आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professor Injured In Attack Of Thieves, Divya Marathi

लुटारूंच्या मारहाणीत प्राध्यापक गंभीर जखमी, अंबाजोगाईतील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - दोघा लुटारूंच्या मारहाणीत योगेश्वरी महाविद्यालयातील प्राध्यापक सुरेश जाधवर (42) गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. श्वानपथक, दरोडा प्रतिबंधक पथकाने घटनास्थळी पाहणी केली. मात्र, पथकाच्या हाती काहीच लागले नाही.

केमिस्ट्रीचे प्राध्यापक सुरेश चंद्रभान जाधवर शेपवाडी परिसरातील तिरुपतीनगरात राहतात. त्यांची पत्नी रेखा या गिरवली जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. रात्री एक वाजता लुटारूंनी चॅनल गेटचे कुलूप तोडले. प्रा. जाधवर यांनी लुटारूंना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. लुटारूंनी लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी
होऊन ते बेशुद्ध पडले.

घटनेनंतर तासाभराने त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाने लुटारू पळून गेल्याचे पाहून आरडाओरड केली. दुसर्‍या खोलीत झोपलेल्या रेखा यांनी खोलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला; परंतु लुटारूंनी सर्व खोल्यांचे दरवाजे बाहेरून लावले होते. शेजार्‍यांनी प्रा. जाधवर यांना स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना नंतर लातूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. लुटारूंनी प्रा. जाधवर यांच्या घरातील दहा हजार रुपये लांबवल्याचा अंदाज आहे. सध्या हे कुटुंबीय लातूरला असल्याने ते घरी आल्यानंतरच चोरीचा खुलासा होऊ शकेल.