आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उदगीरमध्‍ये प्राध्यापक पुत्राचा एटीएमवर हातोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका प्राध्यापकाच्या मुलाने गुरुवारी रात्री एक वाजता एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. वडील खर्चायला पैसे देत नसल्याच्या वैफल्यातून सधन कुटुंबातील विस्तृत गंगाधर सुपारे (19) याने एटीएमवर हातोड्याचे घाव घातले. मात्र, त्याच वेळी पोलिसांची गाडी तेथून जात असल्याने त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

दरम्यान, या तरुणाने चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याचेही सांगितले. उदगीर ग्रामीणचे पो.नि. लक्ष्मण केंद्रे गस्त घालत होते. त्यांना एक तरुण लपताना दिसला. केंद्रे यांनी त्याला पकडले असता त्याच्याकडे हातोडा आढळला. चौकशीत त्याने महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

30 गाड्यांच्या काचा फोडल्या
उदगीरमध्ये पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी रस्त्यावर आणि घराच्या आवारात उभ्या केलेल्या गाड्या फोडण्याचे सत्र सुरू आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्या कारसह सुमारे तीस गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्या काचा आपणच फोडल्याचे सुपारेने कबूल केले आहे. दरम्यान, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.