आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री जैन यांच्या मुक्ततेसाठी निषेध मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणाच्या आरोपात वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची जामिनावर मुक्तता करावी या मागणीसाठी सकल जैन समाज बांधवांनी शनिवारी (20 एप्रिल) वैजापूर बंदचे आवाहन केले आहे.

तब्बल 14 वर्षे नगराध्यक्ष, 33 वर्षे आमदार व 2 वर्षाहून अधिक काळ कॅबिनेट मंत्रिपदावर राहिलेल्या सुरेश जैन यांना जळगाव घरकुल घोटाळ्यात गेल्या वर्षभरापासून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यामध्ये जैन यांच्यासह आणखी जवळपास 50 पेक्षा अधिक नेतेमंडळींचा समावेश आहे. पण त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. शनिवारी बंद पाळून तहसील कार्यालयावर जैन समाजातर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

जैन बांधवांची पदफेरी : सुरेश जैन यांच्या जामिनावरील मुक्ततेसाठी शनिवारी पुकारण्यात आलेल्या ‘शहर बंद’मध्ये समस्त जैन समाजातील व्यापा- यांनी सहभागी व्हावे यासाठी गुरुवारी जैन संघटनेच्या वतीने फेरी काढण्यात आली.