आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन आगे हत्या प्रकरण; फेरतपासणीसाठी आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे या युवकाच्या खून प्रकरणाची फेरतपासणी करण्यात यावी, यापूर्वी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. यासंदर्भात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.   निवेदनावर साहेबराव गजभारे, सुप्रिया गायकवाड, सुदर्शन जोंधळे, सुमीत गजभारे, गंगाधर गायकवाड, साजन लोखंडे, धम्मानंद सोनकांबळे आदींच्या सह्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...