आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्यूटीवर असताना पीएसआयची गोळी झाडून आत्महत्या, जालन्‍यातील घटना, वाचा सुसाइड नोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पीएसआय प्रभाकर पठाडे यांनी शुक्रवारी मध्यरात्री सायबर लॅबसमोर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. जिल्हा नियंत्रण कक्षात सीआरओ ड्यूटीवर असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. एका फसवणूक प्रकरणात फिर्यादीने खोटी तक्रार केल्याच्या ताणामुळे त्यांनी ही आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय, याबाबत पठाडे यांनी सुसाइड नोटही लिहून ठेवली आहे.

एसपी ज्योतिप्रिया सिंह म्हणाल्या, तपास अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू. पठाडे हे अत्यंत चांगले अधिकारी होते. त्यांच्या जाण्यामुळे मोठा धक्का बसला आहे. पठाडे यांची सुसाइड नोट तपासकामी जप्त करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, मोबाइल व डायरीही मिळून आली आहे. काही दिवसांपूर्वी तालुका पोलिस ठाण्यात पोल्ट्री खाद्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या तपासादरम्यान तालुका पोलिसांनी आरोपीकडून ४५ हजार रुपये जप्त केले होते. मात्र, पोलिसांनी यात पैशाची अफरातफर केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. यानुषंगाने शहर डीवायएसपींनी चौकशीही लावलेली आहे. आता याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल, असेही सिंह या वेळी म्हणाल्या.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पठाडेंना प्रशस्तीपत्र.. आणि त्‍यांनी लिहिलेली सुसाइड नोट...
बातम्या आणखी आहेत...