आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: PSI चा अकरावीतील मुलीवर बलात्‍कार, आई-वडिलांच्‍या डोक्‍याला लावली रिव्हॉल्व्हर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राज्‍यातील महिला आणि अल्‍पवयीन मुलींची सुरक्षा गेल्‍या काही दिवसांपासून धोक्‍यात आल्‍याचे आपण पाहतो. नगर जिल्‍ह्यातील कोपर्डी बलात्‍कार हत्‍या प्रकरणानंतर भांबोरा त्‍यापाठाेपाठ नांदगाव शिंगवे येथे अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार झाला. मात्र आता उस्‍मानाबादमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. येथे एक पोलिस उपनिरीक्षकानेच अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केला आहे. रिव्हॉल्व्हरची दाखवली भीती..
ज्‍यांच्‍यावर रक्षक म्‍हणून विश्‍वास ठेवायचा तेच जेव्‍हा भक्षक होतील, तर विश्‍वास कुणावर ठेवावा हा प्रश्‍न आहे. उस्‍मानाबादमध्‍ये एका अल्पवयीन मुलीवर पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. रिव्‍हॉल्‍व्‍हरचा धाक दाखवून या मुलीवर बलात्‍कार केला आहे. पीडित मुलगी अकराव्‍या वर्गात शिकते. प्रेम बनसोडे असे या 26 वर्षीय आरोपी पीएसआयचे नाव आहे. आनंदनगर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पीएसआय प्रेम बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पीएसआय प्रेम बनसोडे हा उस्मानाबादचा रहिवाशी आहे.
- बनसोडे हा सध्या सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
- बलात्कारप्रकरणी गुन्हा नोंदवू नये, म्हणून त्‍याने पीडित मुलीच्या आई-वडिलांनाही धमकावले.
- पीडितेच्‍या पालकांच्‍या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून बनसोडेने धमकी दिली.
- आरोपी पीएसआय प्रेम बनसोडे याला तात्काळ अटक करण्यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अहमदनगर- सराफा दुकानावर गोळीबार, शेवगाव बंद
कल्‍याण-नगर रस्‍त्‍याला तडे
बातम्या आणखी आहेत...