आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा होण्याची गरज; शरद पवारांची सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या उस्मानाबादच्या पोलिस उपनिरीक्षकाला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

११ वीत शिकणाऱ्या शहरातील अल्पवयीन मुलीवर पोलिस उपनिरीक्षकानेच अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर पवार रविवारी शहरात आले. त्यांनी पोलिस प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह अन्य नेते उपस्थित हाेते. पवार म्हणाले, राज्यात महिला अत्याचारांत वाढ झाली आहे. राज्यात कुणाचाच वचक नसल्यामुळे हे प्रकार घडत आहेत. उस्मानाबादेतील घटना निंदनीय आहे. यातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, पीडित मुलीची बाजू मांडण्यासाठी चांगला वकील नेमावा, आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार होऊ नये, असेही पवार म्हणाले.

पीडित मुलगी तीच्या कुटुंबाची ओळख जाहीर होऊ नये, यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी उस्मानाबादेतील पीडित मुलगी तिच्या नातेवाईकाची भेट घेतली नाही, असेही ते म्हणाले.

गृहमंत्रिपद सांभाळण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची गरज
मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असण्याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडेही गृहमंत्रिपद होते. यामुळे मी यासंदर्भात काही बोलणार नाही. मात्र, सध्याची ढासळलेली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता गृहमंत्रिपदासाठी वेगळ्या माणसाची गरज आहे. राज्याच्या नेतृत्वाने यासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. महिला अत्याचारांत राज्याचा चौथा क्रमांक लागतो. ही बाब योग्य नाही. या यादीतून राज्य बाहेर पडणे आवश्यक आहे. आरोपींना शिक्षेचे प्रमाणही वाढले पाहिजे.
शरद पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्देे...
- हवामानाच्‍या व्‍यत्‍ययामुळे विमान वापरता आले नाही. तरीही 9 तासांचा प्रवास करुन आलो.
- पीडित तरुणीची ओळख बाहेर पडू देऊ नये, म्‍हणून त्‍यांची भेट घेण्‍याचे नाकारले.
- हे प्रकरण जलदगती न्‍यायालयात चालवले गेले पाहिजे.
- या बलात्‍कार प्रकरणावर विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.
- प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी महिला आयपीएसची नियुक्‍ती व्हावी.
- शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या मनात अस्वस्थता पसरली आहे.
- गृहखात्यावर निगराणी ठेवणाऱ्या योग्य व्यक्तीची आवश्यकता आहे.
- कायदे पुरेसे आहेत मात्र, यंत्रणेचा दरारा राहिला नाही.
काय आहे बलात्‍कार प्रकरण-
- उस्‍मानाबादमध्‍ये एका अल्पवयीन मुलीवर पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. - रिव्‍हॉल्‍व्‍हरचा धाक दाखवून या मुलीवर बलात्‍कार केला आहे.
- पीडित मुलगी अकराव्‍या वर्गात शिकते.
- प्रेम बनसोडे असे या 26 वर्षीय आरोपी पीएसआयचे नाव आहे.
- आनंदनगर ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी बनसोडेवर गुन्हा दाखल केला गेला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पीडित मुलीच्‍या आई-वडिलांनाही दाखवला बंदुकीचा धाक..
बातम्या आणखी आहेत...