आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरखेड्यातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; अडगळीतील शौचालये वापरात आण्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशी- तालुक्यातील तेरखेडा येथील दहा सार्वजनिक शौचालयांना झाडाझुडपांचा वेढा पडला असून पडझड होऊन प्रचंड दुरवस्था झाली आहे. स्वच्छता मिशन राबविले जात असताना येथील शौचालयांची परिस्थिती बघून स्थानिक सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय यंत्रणेची डोळेझाक  होत आहे.  

शासन वैयक्तिक शौचालयांच्या उभारणीवर  भर देत आहे. स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वितेसाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.  

नागरिकांनीही मोहिमेत सहभाग घेत घरांमध्ये वैयक्तिक शौचालये उभारले आहेत. बेसलाइन सर्व्हेनुसार गावातील लाभार्थ्यांची यादी बनवून त्याप्रमाणे गावनिहाय लक्ष निर्धारित केले. त्यानुसार वैयक्तिक शौचालयांचा लाभ देण्यात आला. बेसलाइन सर्व्हेच्या  यादीप्रमाणे वैयक्तिक शौचालयाची बांधणी झाली खरी मात्र आजही प्रत्येक गावातील काही कुटुंब या सर्व्हेच्या यादीत नसल्याने वैयक्तिक शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत. त्याचबरोबर यादीत नाव असूनही जागेच्या अडचणीमुळे व इतर घरगुती कारणामुळे काही लाभार्थी शौचालयांचा लाभ घेऊ शकले नाहीत. परिणामी प्रत्येक गावाचा विचार करता सरासरी १० ते १५ टक्के कुटुंब आजही शौचालयाचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. लाभापासून वंचित अशा कुटुंबांसाठी सार्वजनिक शौचालये मदतगार ठरू शकतात. हागणदारीमुक्त गावासाठी हे प्रभावी माध्यम ठरु शकते. मात्र, तेरखेडा येथील बायपास रोडवरील पुलाजवळील सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेमुळे हागणदारीमुक्तीला ब्रेक बसल्याचे बोलले जात आहे. 
 
अडगळीतील शौचालये वापरात आण्याची गरज  
जिल्ह्यात सर्व्हे करून गरज असेल तेथे स्थानिक प्रशासन व सत्ताधाऱ्यांनाही सार्वजनिक शौचालयांची देखभाल-दुरुस्ती करून लोकांसाठी वापरात आणण्यासाठीचे योग्य निर्देश देण्याची गरज आहे. नवीन बांधकामासाठी लाखो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा ही अडगळीत पडलेली जुनीच शौचालये वापरात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...