आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आईच्या त्रासाने घरातून निघून गेलेले पूजा, रंगा दोघेही सापडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - भीक मागून घरी पैसे का आणत नाही म्हणून सावत्रआईकडून दिल्या जाणार्‍या त्रासाला कंटाळून बीडहून जालनामार्गे रेल्वेने पुण्या-मुंबईला गेलेल्या पूजा व रंगा या दोन भावंडांना समतोल फाउंडेशनचे संस्थाचालक विजय जाधव व मुलांची आजी कोतनबाई यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना सहीसलामत बीडला आणता आले.
वासनवाडी येथील सुरेश पवार यांचा सात वर्षांचा मुलगा रंगा व मुलगी पूजा (10) या दोघांचे भाजी मंडईतून अपहरण केल्याची तक्रार मुलांची सावत्रआई फुलाबाईने शहर ठाण्यात दिल्यानंतर पोलिस कामाला लागले. पूजा व रंगा हे दोघे 12 जानेवारीला प्रत्यक्षात वासनवाडीहून बीडच्या बसस्थानकावर आल्यानंतर जालन्याकडे जाणार्‍या बसमध्ये बसले. ते दीडशे रुपयांत जालन्याला पोहोचले.
जालन्यात दोघे मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेत बसले. प्रवासादरम्यान रेल्वे पुण्याला आल्यावर पूजा पुण्याच्या रेल्वेस्टेशनवर उतरली अन् रंगा झोपेतच थेट मुंबईला पोहोचला. याच ठिकाणी दोघांची ताटातूट झाली. पुण्यात पूजा भीक मागत असताना तिची भेट तिची आजी कोतनबाईशी झाली अन् रडू कोसळले. आई फुलाबाई भीक मागण्यासाठी मारहाण करत असल्याचे पूजाने तिच्या आजीला सांगितले. कोतनबाई व पूजा हे दोघे पुण्याहून रंगाच्या शोधासाठी दादरला गेले, पण रंगा दिसला नसल्याने परत ते 25 जानेवारीला जालना जिल्ह्यातील परतूरला मोठी मुलगी धाराबाई चव्हाण हिच्याकडे आले. कोतनबाईने फुलाबाईला फोन करून पूजा माझ्याकडे असल्याचे सांगितले.
रंगा मुंबईत सापडला
जालन्याहून पुणेमार्गे मुंबईला गेलेल्या रंगाला लोकांनी समतोल फाउंडेशन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सुरक्षित पोहोचवले. संस्थाचालक विजय जाधव यांनी बीड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईहून बीडला आणल्यानंतर 30 जानेवारीला बालसुधारगृहात आणले. त्यानंतर रंगाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.