आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुसद-लातूर बसला अपघात, 6 ठार तर 11 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील चुंचा पाटीजवळील वळणावर रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पुसद-लातूर बस आणि भरधाव ट्रकच्या अपघातात बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की बस एका बाजूने पूर्ण चिरली. मृतांत एका महिलेचा समावेश असून 11 जखमी आहेत.
पुसदहून लातूरला निघालेली बस (एमएच 40 एन 8960) हदगावमार्गे नांदेडकडे जात होती. कळमनुरी तालुक्यातील चुंचा पाटीपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या वळणावर हदगावकडे जाणारा भरधाव ट्रक (ओआर 15 आर 0859) बसला भिडला. यामुळे बस चिरत गेली. चालकाच्या बाजूने बसलेले सहा प्रवासी जागीच ठार झाले. अन्य 11 प्रवासी जखमी असून इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये विमल सदाशिवराव आकेवार (60, रा. हिंगोली), गोविंद गायकवाड (60, रा. गोरलेगाव, जि. नांदेड), बालाजी मारुती कुबडे (40, रा. नांदेड) यांचा समावेश असून तिघांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे पीआय महेंद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.