आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औंढा तालुक्यात पाच फूट अजगर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी शिवारात सोयाबीनच्या शेतात निंदणी-खुरपणी करत असणार्‍या महिलांना सुमारे पाच फूट लांबीचा अजगर आढळल्यानंतर मजुरांची पळापळ झाली.

अंजनवाडी येथील खंडेराव दराडे यांच्या सोयाबीन शेतातील तणकट निंदणीचे काम मजूर महिलांकडून सुरू होते. सकाळी ११ च्या सुमारास या महिलांना सोयाबीन हलताना दिसले. जवळ गेले असता फुस्स... असा आवाजही येत होता. पुरुष मजुरांनी काठीने सोयाबीनची झाडे बाजूला सारून पाहिली असता सुमारे पाच फूट लांबीचा भलामोठा अजगर आढळला.

शेतमालक दराडे यांना माहिती समजताच त्यांनी अजगराला न मारता औंढा नागनाथ येथील वन विभाग आणि सर्पमित्र महादेव कपाटे यांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र कपाटे यांनी अजगर सुरक्षितपणे पकडला आणि वन विभागाच्या सूचनेनुसार त्याला वन पर्यटन क्षेत्रातील जंगलात सोडून देण्यात आले.