आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरमध्‍ये तूर खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर हमी भावानुसार किंमत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली असून मागील १५ दिवसांत दोन हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रास आज बाजार समितीचे सभापती संजय जाधव, उपसभापती शिवाजी बोडखे, संचालक मधुकर चव्हाण, राजेंद्र दंडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 
 
तूर खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे या वेळी सांगण्यात आले. तूर खरेदीसाठी आता पुरेसा बारदाना असल्यामुळे आता नियमितपणे खरेदी सुरू राहील, असे आश्वासन या वेळी सभापती जाधव यांनी दिले. केंद्रासमोर आज ४० ते ५० वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...