आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Patil News In Marathi, Irrigation Scam, Nationalist Congress

सिंचनात 70 हजार कोटींचा घोटाळा कसा - आर. आर. पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - राज्यात सिंचनावर 40 हजार कोटींचा खर्च झालेला असताना विरोधक 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बुधवारी पाथरी येथे केला. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.


पाथरीत विकासकामांचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आचारसंहिता सुरू झाल्यामुळे कुठलेही उद्घाटन करता आले नाही. पाटील म्हणाले, राज्यात सिंचन क्षेत्रातील घोटाळ्याचा आरोप विरोधक करीत आहेत. परंतु तो त्यांना सिद्ध करून दाखवता येत नाही. कारण, झालेला खर्च व त्यांचा आरोप यातील विसंगती समोर आहे. 40 हजार कोटी खर्च झालेले असताना 70 हजार कोटींचा आरोप कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


शेतक-यांच्या मदतीसाठी आयोगाची परवानगी घेऊ : मराठवाड्यात झालेल्या गारपिटीवर शेतक-यांना मदत करण्याबाबत आचारसंहितेमुळे कोणतेही भाष्य करता येणार नाही. परंतु शेतक-याला मदत देण्यासाठी प्रसंगी आम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ, असेही पाटील म्हणाले.