आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: राधे माँची झलक घेण्‍यासाठी नांदेड गुरुद्वारा परिसरात गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुद्वारामध्‍ये पोहोचलेली राधे मॉं - Divya Marathi
गुरुद्वारामध्‍ये पोहोचलेली राधे मॉं
नांदेड - वादग्रस्‍त धर्मगुरू राधे माँ ही आज (शनिवार) पहाटे 4 वाजता शहरात दाखल झाली. दरम्‍यान, सकाळी 6.30 वाजता ती गुरुद्वारा परिसरात दर्शनासाठी पोहोचली. तिच्‍या एका झलकेसाठी नागरिकांनी गुरूद्वारा परिसरात गर्दी केली होती. काहींनी राधे माँ हिचे दर्शनही घेतले.

सकाळी 6.30 वाजताच्‍या सुमारास राधे माँ ही गुरुद्वारा परिसरात पोहोचली. आपल्‍या लग्‍जरी गाडीतून खाली उतरल्‍यानंतर गुरूद्वारा येथे आलेल्‍या भाविकांनी तिला पाहण्‍यासाठी गर्दी केली. लाल रंगाचा शालू, हाती त्रिशूळ घेऊन असलेल्‍या राधे मॉंने भडक मेकप केलेला होता. त्‍याच्‍या सोबत सहा महिला आणि सात पुरुष होते.
औरंगाबादमध्‍ये पोलिसांनी केली दोन तास
गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येण्‍यापूर्वी राधे माँ ही शुक्रवारी औरंगाबादला मुक्‍कामी होती. औरंगाबादच्या गुन्हे शाखेने तिची दोन तास कसून चौकशी केली. राधेमाँ मिटमिट्यातील आलिशान मेडोज रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तेथे धडकले. मात्र, मुंबईतून कोणतीही सूचना नसल्याने त्यांना अटक केली नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राधे माँचे नांदेड येथील फोटोज...