आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी उद्या नांदेडमध्ये; महानगरपालीका निवडणुकीच्‍या पार्श्‍वभुमीर कॉ्ग्रसचा मेळावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवार काँग्रेसचा मेळावा होणार आहे. महापालिकेची निवडणूक आजच जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व आले आहे. नांदेड हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. आता महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे काँग्रेसनेही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 
बातम्या आणखी आहेत...