आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Khare Become Finalist In Gowrav Maharashtracha Show

भोकनगावचा राहुल खरे ‘गौरव महाराष्ट्राचा’ महाविजेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - येथील संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमात गेल्या आठ वर्षांपासून वारकरी शिक्षणाच्या माध्यमातून संगीताचे धडे घेत असलेला राहुल खरे हा ई टीव्ही वाहिनीवरील ‘गौरव महाराष्ट्राचा, शोध सुरेल नात्याचा’ या रिअॅलिटी शोचा महाविजेता ठरला आहे.

मूळचा कन्नड तालुक्यातील भोकनगाव या छोट्या खेड्यातील राहिवासी असलेला राहुल खरे हा युवक सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. माध्यमिक शिक्षणासाठी २००६ पासून शिऊर येथील वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ स्वामी भिंगारे यांनी स्थापन केलेल्या संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमात आठ वर्षांपासून वारकरी शास्त्रीय शिक्षण राहुल घेत आहे. त्याच्या संगीतावरील अतूट प्रेम आणि अफाट मेहनतीच्या जोरावर ई टीव्ही मराठी या वाहिनीवरील गौरव महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वातील महाविजेता होण्याचा सन्मान मिळवून आपल्या आई-वडील तसेच गुरुजनांची मान उंचावली. दिवंगत गुरुवर्य रंगनाथ स्वामी भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाचे शास्त्रीय संगीताचे धडे घेत शिक्षणाबरोबच परिसरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम करत असताना मागील वर्षीच झी मराठीच्या ‘सारेगमप’ या गाण्यांच्या रिअॅलिटी शोसाठी राहुल खरे याने प्रयत्न केला खरा, परंतु त्यात त्याला फारसे यश आले नाही. त्यानंतर अपयशाने खचून जाता संगीत क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी अविरत प्रयत्न सुरूच ठेवले.
औरंगाबाद येथील गजानन कुचे विश्वनाथ दाशरथे यांच्याकडे संगीत विशारद होण्याचे धडे घेण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांपूर्वी निवड चाचणीत अंतिम चौदा स्पर्धकांत राहुल खरे याची निवड झाली. मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत असताना रवींद्र खोमणे या स्पर्धक गायकाची सुरेल साथ लाभली. परीक्षक प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर या तज्ज्ञांच्या पसंतीस उतरत प्रशिक्षक मिलिंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम पाच मध्ये धडक मारत महाविजेतेपद मिळवण्याचा मान मिळवला.


अभिमान वाटतो
^स्वामीजींनी स्थापन केलेल्या विद्यार्थी आश्रमाच्या माध्यमातून गुरुबंधू राहुल खरे यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून तुकाराम आश्रमाचे नाव महाराष्ट्रात पोहाेचवले स्वामींचे स्वप्न साकार केले आहे, याचा अभिमान वाटतो. ज्ञानेश्वरमहाराज मधाने, अध्यक्षसंत तुकाराम विद्यार्थी आश्रम

२२ रोजी होणार प्रसारण
रविवारी महाअंतिम सोहळ्याचे प्रक्षेपण राहुल खरे याने महाअंतिम सोहळ्यात सुरेल गीतांचे केलेले सादरीकरण त्यातून मिळालेले पारितोषिक याचे सादरीकरण २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता टीव्ही वाहिनीवर होणार आहे.