आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडकतच्या कत्तलखान्यावर छापा, 27 गायींची सुटका; एक अटकेत, दोघे फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- आष्टी तालुक्यातील खडकत येथे गोवंशातील गाय, बैलांची कत्तलखान्यावर हत्या करण्यात येत असल्याची माहिती  बीडच्या पोलिस अधीक्षकांना  मिळताच शनिवारी रात्री अधीक्षकांनी आष्टी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. आष्टी पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत एकास अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी  मांस घेऊन पसार झाले आहेत.  पोलिसांनी या कारवाईत २७ गायी व बैलांची सुटका केली आहे. बीड जिल्हा पोलिसांनी केलेली आजपर्यंतची  तिसरी मोठी कारवाई  आहे. 

शनिवार २ सप्टेंबर रोजी रात्री  पावणे अकरा वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर जनावरांची कत्तल सुरू असल्याचे  कळाल्यानंतर  पोलिस अधीक्षक जी.श्रीधर  यांनी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले.  बीट अंमलदार अशोक केदार, पोलिस नाईक नवनाथ काळे, प्रशांत क्षीरसागर, विजय गोरे, अनिल गोडसे यांनी खडकत येथे  कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत मुनार जब्बार शेख  (रा.मस्जिद गल्ली, खडकत)  याला पोलिसांनी पकडले असून  त्याचे साथीदार मुक्तदीर आबेद शेख, नासिर बाबूलाल पठाण हे दोघे जण मांस घेऊन पसार झाले. या छाप्यात पोलिसांना घटनास्थळी केवळ गायीचे कातडे आढळून आले. तर कत्तलखान्यात २७ गायी व बैल अशी  गोवंश जनावरे दावणीला बांधून होती.  या प्रकरणी  पोलिसांनी रविवारी सकाळी घटनास्थळी पंचनामा करून महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्याप्रमाणे  आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गायी-वासरे गोशाळेत सोडली 
पोलिसांनी  टाकलेल्या छाप्यात  खडकत  येथे सापडलेल्या १२  गायी आणि १५ वासरे शेकापूर येथील परमेश्वर लाड यांच्या गोशाळेत सोडण्यात आली आहेत. खडकत येथे अनेक ठिकाणी गोवंश हत्येचे प्रकार घडत असताना आष्टी पोलिस का कारवाई करत नाहीत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 
बातम्या आणखी आहेत...