आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात जुगारावर धाड, १८ अटकेत, दोन लाख २२ हजारांची रोकड जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- बस्थानक परिसरात असलेल्या ‘पार्थ’ लॉजवर रविवारी सायंकाळी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या १८ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख २२ हजार ५४० रुपये रोख, १६ मोबाइल हँडसेट व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. गांधी चौक पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून एक आरोपी फरार आहे.

लातूर शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी रविवारी पदभार घेतला व पदभार घेताच त्यांनी अशी कारवाई करून लातूरकरांचे लक्ष वेधले. पार्थ लॉजवर जुगार चालत असल्याची माहिती चव्हाण यांनी काढली होती. त्यावरून त्यांनी सापळा रचला पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. वाघमोडे यांच्यासह सहा पोलिस कर्मचाऱ्यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला. लॉजच्या टेरेसवर जुगार सुरू होता. १८ जण हाती लागले तर एक पळाला.

अटक केलेल्यांत ज्ञानेश्वर नारायण पतंगे, सुरेश बाळकृष्ण शुक्ला, अखिल पठाण, रमेश शिवाजी साळवे, विशाल सुधाकर भालेकर, राहुल माणिकराव लोमटे, जयसिंग हरिभाऊ आपेट, निखिल जाधव, रमेश शिवाजी साळवे (सर्व रा.अंबाजोगाई), अनिल सुदर्शन काळे, विनोद फड, चंद्रकांत बालाजी फड (धर्मापुरी), योगेंद्र बाबूराव जोंधळे (नांदेड),श्याम अशोक भोसले (सुगाव- नांदेड) मारुती दत्ता बनसोडे (परभणी), जावेद अहमद कुरेशी, संजय नारायण कदम, शकील महंमद शेख (लातूर) यांचा समावेश असून सतीश चामनेर हा आरोपी फरार झाल्याचे पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...