आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्ती उद्योग समूहाच्या व्यवहाराची चौकशी, पथकात मुंबईतील अधिकार्‍यांचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर येथे मुख्यालय असलेल्या कीर्ती उद्योग समूहाच्या व्यवहाराची सोमवारी विक्रीकर खात्याच्या मुंबईतील अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशी केली. कीर्ती समूहाचे लातूरमधील मुख्यालय, लातूर, सोलापूर आणि नांदेडमधील क्रशिंग युनिट, लातूरमधील निवासस्थान यासह पाच ते सहा ठिकाणी एकाच वेळी पथकाचे अधिकारी पोहोचले. सुमारे पाच-सहा तास कंपनीच्या व्यवहाराच्या तपासणीचे काम सुरू होते. मात्र त्यात काही अनियमितता आढळली का याची माहिती कळू शकली नाही.
लातूर येथे मुख्यालय असलेला कीर्ती उद्योग समूह सोयाबीनपासून तेल निर्मितीचे काम करतो. कंपनीचे लातूर, नांदेड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी क्रशिंग युनिट आहेत. त्यासाठी लातूर आडत बाजार येथे असलेले मुख्यालय, त्या-त्या ठिकाणचे युनिट येथे सोयाबीनची थेट खरेदी केली जाते. कंपनीला दररोज सुमारे 10 हजार टन सोयाबीनची गरज भासते. सोयाबीनची खरेदी आणि तेलाची विक्री असा उद्योग असलेल्या या समूहाच्या व्यवहाराची मुंबईच्या विक्रीकर विभागाच्या पथकाने सहा ठिकाणी एकाच वेळी चौकशी केली. यामुळे लातूरच्या बाजारात खळबळ उडाली. व्यवहाराचा तपशील मात्र सायंकाळपर्यंत समजू शकला नाही.

छापा नव्हे, ही तर नियमित तपासणी
विक्रीकर विभागाचे पथक दरवर्षीच विविध उद्योगांच्या कार्यालयांमध्ये जाऊन तपासणी करीत असते. तपासणीची ही जुनीच पद्धत आहे. याला छापा म्हणता येणार नाही. आम्ही जे रिटर्न दाखल केलेले असते त्याच्या नोंदी आमच्याकडे आहेत की नाही याची पडताळणी केली जाते. तसेच काही त्रुटी आढळल्या तर त्या दुरुस्त करून घेतल्या जातात. कंपनीचे सगळे व्यवहार कायद्याला धरूनच केलेले आहेत. त्यामुळे काळजी नाही. कीर्ती भुतडा, संचालक, कीर्ती उद्योग समूह