आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध सावकारी प्रकरण कडपेंच्या घरावर छापा, स.निबंधकची कारवाई, कागदपत्रे हस्तगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर- सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने राष्ट्रवादीचे नेते बळीराम कडपे यांच्या घरावर गुरुवारी छापे टाकले. तालुक्यातील रायगव्हाण आष्टी या दोन ठिकाणी तीन पथकांनी ही कारवाई कारवाई केली. यात १९ खरेदी खत,१९ सातबारा,१० इतर दस्तएेजव,दोन मुद्रांक शुल्क पेपर असे जवळपास ५० कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. बळीराम कडपे यांच्या पत्नी विमल कडपे या जालना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून १९९७ ९८ या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून एक वर्ष काम पहिले आहे. 

रायगव्हाण येथील मुरलीधर गणपती केकान, महादेव परबत पोटे, प्रयागबाई हरिभाऊ पोटे यांनी बळीराम अश्रोबा कडपे यांच्या विरुद्ध परतूर येथील सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. कडपे यांनी १६१.९० आर जमीन बेकायदेशीर सावकारी करत आपल्या नात्यातील श्रीकृष्ण अश्रोबा कडपे, अनिरुद्ध उद्धवराव कडपे, उद्धव अश्रोबा कडपे, सुधामती अच्युतराव पोते, वाल्मिक बळीराम कडपे, विजय बळीराम कडपे आदी व्यक्तींच्या नावावर केली असे तक्रारीत म्हटले होते. 

या तक्रारीनंतर अाैरंगाबाद येथील विभागीय सहायक निबंधक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक संजीव देवरे यांच्या तीन पथकांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास बळीराम कडपे यांच्या मूळ गावी रायगव्हाण येथे आष्टीचे घर , किराणा दुकान कापड दुकानावर एकाच वेळी छापे मारले. दुपारी एक वाजेपर्यंत तिन्ही ठिकाणी कसून झडती घेण्यात आली. यात मुद्रांक शुल्कासह काही कागदपत्रे हस्तगत केलीत. या कागदपत्राची चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे सहायक निबंधक देवरे यांनी सांगितले आहे. कारवाई पूर्ण करण्यासाठी नवीन सातपुते, डी.बी.बावस्कर, जी.पी.सरोदे, पी.वी.गावंडे, पी.आर.मोताळे, जिलानी शहा, विकास पिंगळे, मंगेश जोशी, जे,पी.नागरे, याच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

जमीन वडिलोपार्जित, कारवाई सुडापोटी 
ही कारवाई राजकीय सुडापोटी आहे. पालकमंत्र्यांनी काही लोकांना हाताशी धरून मुद्दामहून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची सदरील जमीन ही वडिलोपार्जित असून सर्व उत्पन्नाचे स्त्रोत कायदेशीर असून त्यावर आम्ही शासनाकडे नियमानुसार कर भरतो. 
- बळीरामकडपे, राॅकाॅनेते. 

माझा संबंध नाही 
निवडणूका संपल्या आहे त्यामुळे आता राजकारणाचा प्रश्नच येत नाही. कडपे यांनी काय केले आपल्याला माहित नाही. प्रशासन त्यांच्या पध्दतीने काम करीत आहे. याप्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. 
- बबनराव लोणीकर, पालकमंत्री, जालना. 
बातम्या आणखी आहेत...