आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पडून राज्यात सात जणांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव /शिरूर कासार - बीड जिल्ह्यात शुक्रवारी विविध ठिकाणी वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. माजलगाव शहरालगत मनूर शिवारातील शेतात वीज पडून शेतमजूर जागीच ठार झाला, तर शिरूर कासार तालुक्यातही वीज पडून एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर भाजले.

मनूरवाडी शिवारात लिंगेश्वर खुरपे यांच्या शेतात वीज पडून काम करत असलेला सालगडी शेख हारुण (रा.हदगाव नखाते, ता.पाथ्री, जि. परभणी) याचा जागीच मृत्यू झाला. शिरूर कासार तालुक्यात निमगाव मायंबा येथेही वीज पडून लक्ष्मीकांत विश्वनाथ तातोडे (47, रा. निमगाव मायंबा) यांचा मृत्यू झाला. अक्षय परमेश्वर देवकर (16) गंभीर भाजला. तिसर्‍या घटनेत नांदेवली येथे वीज पडून ज्ञानेश्वर हरिभाऊ थिटे (26) गंभीर जखमी झाले.

सोलापूर, कोल्हापुरातही बळी
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले बसस्थानकात दोन प्रवाशांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.सोलापूर जिल्ह्यातील तरणफळ (ता. माळशिरस) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला.

नाळवंडीत दोघांचा मृत्यू
बीड शहराजवळ असलेल्या नाळवंडी नाका भागातील वीटभट्टीवर शुक्रवारी रात्री वादळी पावसात वीज कोसळल्याने महंमद रफिक शफिक (25), अजब नसीर तडवी (18, दोघे रा. अकोला) हे दोन मजूर ठार झाले.