आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकट्या प्रवाशांकडून 2 लाखांचा दंड वसूल; नांदेड दक्षिण मध्य रेल्वेची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड-  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गुरुवारी मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी करत ४४७  फुकट्या प्रवाशांकडून १ लाख ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.  

या तिकीट तपासणी मोहिमेत दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक  नेहा रत्नाकर, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अंजी नायक सहभागी झाले होते. ही मोहीम पहाटे पाच  वाजता सुरू करण्यात आली. यात नांदेड ते आदिलाबाद, परभणी ते परळी, मुदखेड ते आदिलाबाद, पूर्णा ते अकोला अशा विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली.   धावणाऱ्या रेल्वेमध्ये, सेक्शनमध्ये अचानक धाड पडल्याने विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले. यात एकूण ४४७ विनातिकीट प्रवासी सापडले.  परवानगीशिवाय जास्त समान घेऊन जाणाऱ्या तसेच  दंड न भरणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...