आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याला जबर फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यात मागच्या आठवड्यात जाेरदार पाऊस झाल्यामुळे भाजीपाल्याला जबर फटका बसला असून आवक निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. परिणामी भाव दुपटीने वाढले आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून ते ऑक्टोबरमधील सुरुवातीचे दोन-तीन दिवस सतत लातूर जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे हजारो हेक्टर्सवरील पिके पाण्यात गेली. काढणीला आलेल्या सोयबीनसह अन्य िपकांना मोडके फुटली. खरिपातील पिकांना जबर फटका बसलेला असताना त्यातून भाजीपालाही सुटला नाही. मुळात भाजीपाल्याला जास्तीचा पाऊस मारक असतो. अतिवृष्टीमुळे भाजीपाला शेतीत पाणी राहिल्याने त्याची काढणी करता आली. त्यामुळे भाजीपाला जागेवरच वाया गेला. परिणामी, लातूर जिल्ह्यातून उत्पादन होणाऱ्या मालाची आवक प्रचंड खालावली. त्यामुळे भाव वधारले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत येथील बाजारात भाज्यांची आवक ४० टनांपर्यंत गेली होती. बहुतांश आवक लातूर जिल्ह्यातूनच होती. त्यामुळे भाव पडले होते. सध्या जवळपास १३ टन माल येत आहे. त्यात १० टक्केच भाज्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आहेत.

दीड महिन्यापर्यंत तेजी
पावसामुळे भाजीपाल्याला फटका बसल्यामुळे आवक कमी झाली आहे. परिणामी भाव वधारले आहेत. महिनाभरापूर्वी असलेली मंदी आता तेजीत रूपांतरित झाली आहे. आणखी महिना ते दीड महिना भाज्यांचे भाव वधारलेलेच असतील. - श्रीकांत ठोंबरे, सचिव, भाजीपाला
आडत असोसिएशन, लातूर.

भाज्यांचे दर (प्रति किलो रुपयांत)
वांगे- ५५ ते ६०, भेंडी- ३५ ते ४०, गवार- ५५ ते ६०, दोडके-५५ ते ६०, टोमॅटो- ८ ते १०, शेपू- ३० ते ३५, मेथी-१२ ते १५, कोथिंबीर- ३० ते ४०, सिमला मिरची- १० ते १५, फ्लाॅवर-३० ते ३५, पत्ताकोबी- ५ ते ६, कारले- २० ते २५, काकडी- १५ ते २०, शेवगा- ४० ते ५०, िलंबू- २० ते २५, कांदा- ५ ते ८, लसूण - १०० ते १२०, अद्रक- २५ ते ३०
बातम्या आणखी आहेत...