आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लई दिवसानं...लई नवसानं...जालन्यात तासभर बरसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - महिन्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने बुधवारी जालना परिसरात तासभर हजेरी लावली. आधी दुष्काळ अन् नंतर गारपिटीच्या तडाख्याने गारद झालेल्या शेतकर्‍यासह सर्वसामान्यांना या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शहरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी चार वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. अंबड चौफुली, जिल्हाधिकारी कार्यालय, सतकरनगर या भागात पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

(फोटो - जालना शहर व परिसरात बुधवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर झालेल्या या पावसाने जालनेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. छाया : नागेश बेनीवाल)