आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना, बीड, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांत पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड, गेवराई - बीड शहरासह गेवराईत सकाळपासून वातावरण ढगाळ हाेते, तर सायंकाळी काही काळ ऊनही राहिले. रात्री साडेसातच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. बीड शहरासह तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, वडवणी तालुक्यातही पाऊस झाला.
 
गेवराई तालुक्यातील चकलांबा, उमापूर, धोंडराई, राक्षसभुवन, सिरसदेवी, पाचेगाव, गढी, गेवराई, सुशी, चकलांबा, मादळमोहीसह परिसरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. १ जुलै ते ११ जुलैदरम्यान पाऊसच न झाल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. 
 
२४ तासांत १८ मिलिमीटर पाऊस 
हिंगोली -
जिल्ह्यात १३ जुलै रोजी  सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण १८ मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्ह्या त दिवसभरात सरासरी  ३.६० मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर आज सायंकाळीही हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 
 
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २०३.८० मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. तर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी २२.८९ टक्के एवढी झाली आहे. जिल्ह्यात  गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली – ४.५७ (२६४.७०), वसमत – १.४३ (१५४.५४), कळमनुरी – ०.६७ (१२५.८५), औंढा नागनाथ – ३.५० (२३३.६५) , सेनगांव – ७.८३ (२४०.२७). आज  अखेर  पावसाची सरासरी २०३.८० मिमी नोंद झाली आहे. तर आज सायंकाळी हिंगोली शहर व परिसरात २० मिनिटे चांगला संततधार पाऊस झाला. याशिवाय सेनगाव, औंढा नागनाथ या तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...