आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर जिल्ह्यात पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा, देवणी परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.   


गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच बुधवारी सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. निलंग्यात अर्धा तास पाऊस झाला. वलांडी, देवणी, निटूर, औसा, शिरूर अनंतपाळ या परिसरातही पाऊस झाला. दरम्यान, हा पाऊस सुरू असतानाच देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथे वीज कोसळली. या वेळी शेतात काम करीत असलेले शिवाजी बिरादार (६२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजू पुंडलिक बिरादार  हे जखमी झाले. त्यांना वलांडी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. 

 

उस्मानाबाद,तेर येथेही बरसला

तेर- येथे बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दहा मिनिटे जोरदार पाऊस पडला. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसांपासून येथे पावसाचे वातावरण होते. यामुळे थंडीमध्ये घट झाली होती. बुधवारी सायंकाळी अचानकच पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे शेतातील सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. यामुळे रस्ते ओले झाले. पावसामुळे वीजपुरवठा सुमारे २० मिनिटे बंद पडला होता. यामुळे नागरिकांनाही पळापळ करावी लागली.दरम्यान, उस्मानाबाद शहर व परिसरात पाऊस झाला.
बनोटीत अवकाळीचा तडाखा


बनोटी- बनोटी परिसरात दि.२१ (मंगळवारी) संध्याकाळी नऊ वाजता वादळी वाऱ्यासह  जोरदार अवकाळी पाऊस होऊन शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले.   गेल्या दोन दिवसांपासून बनोटी व परिसरात ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी सात वाजेपासून आकाशात विजेचा कडकडाट चालू होता. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. काढलेली मका व इतर पिके झाकण्यासाठी एकच गोंधळ उडाला होता.बनोटीसह परिसरातील मुखेड, वरठाण, गोंदेगाव, नायगाव, वाडी, पळशी परिसरात पावसाचा जोर होता. रात्री नऊ वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण गावात वीज गूल झाली. 

बातम्या आणखी आहेत...