आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पावसाची समाधानकारक सुरुवात, वीज पडून दोन महिलांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - मृगनक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात पावसानेही समाधानकारक सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सरासरी ३८.७८ मिमी पावसाची नोंद झाली असून सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त ९१ मिमी पाऊस झाला आहे. मृग नक्षत्राच्या दिवशी जिल्ह्यात पावसाने केवळ हजेरी लावली होती. त्यानंतरही रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत गेला. गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे.

नांदेडमध्ये वादळी पाऊस
नांदेड- शहरातशुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ मिनिटे पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर जोर कमी होऊन अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती.

लातूरजिल्ह्यात सरी
लातूर - शहरजिल्ह्यात शुक्रवारी कुठे मध्यम, तर कुठे हलका पाऊस झाला. हा पाऊस पेरणीयोग्य नसला तरी त्याच्या आगमनाने शेतकऱ्यांत पेरणीसाठीची लगबग जागली. सात जूनपासून आजतागायत जिल्ह्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र आकाश ढगाळ होते. लातूर शहरात तर सकाळपासूनच मेघगर्जना विजांचा कडकडाट सुरू होता. दुपारपर्यंत मध्यम पाऊस झाला.

परभणीत जोरदार सलामी
परभणी - मृगनक्षत्रावर हजेरी लावलेल्या पावसाने परभणी जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत जोरदार हजेरी लावली. सर्वच तालुक्यांत पावसाने जोरदार सलामी दिली. जिल्ह्यात सरासरी १७.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजवर ३३.१६ मिमी पाऊस झाला अाहे.

वीज कोसळून गर्भवती महिलेसह दोघींचा मृत्यू
उस्मानाबाद- अंगावरवीज कोसळून शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पाथरूड (ता. भूम) शिवारात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याच घटनेत दोन शेळ्या आणि तीन करडे दगावली आहेत. सुलभा महेंद्र तिकटे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत लीला गोरख तिकटे या जखमी झाल्या आहेत. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथेही वीज पडून उषा लाड (४०) यांचा मृत्यू झाला, तर सत्यभामा कदम जखमी झाल्या.