आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, लातूर, नांदेडसह बीड जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, परळीत वादळी वारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळीत तासभर, लातूर जिल्ह्यातील चाकूर, मुरूड, उदगीर, अहमदपूर, किनगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, कंधार व लोहा येथेही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.

लातुरातही पावसाची हजेरी
लातूर- जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारे आणि िवजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. चाकूर तालुक्यातील झरी परिसरात तुरळक प्रमाणात गारपीट झाली, तर लातूर तालुक्यातील मुरूड पोलिस ठाण्यात वीज पडून गाय दगावल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती. लातूर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसात वादळी वाऱ्याचाच अधिक जोर होता. त्यामुळे कुठे पाच, तर कुठे दहा, पंधरा मिनिटे अवकाळी बरसला. चाकूर तालुक्यातील झरी परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेकांची पत्रे उडून गेले. उदगीर येथे १० मिनिटे पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात शिडकावा झाला.

परळी शहरात तासभर
परळी- परळी शहर व परिसरातील काही भागात बुधवारी सायंकाळी वादळ-वाऱ्यासह अन् गडगडाटासह हलका पाऊस झाला. बुधवारी लग्नतिथी असल्यामुळे अाणि अचानक वादळ-वाऱ्यासह पाऊस अाल्याने वऱ्हाडी मंडळींची धांदल उडाली. परळी व परिसरात ढगाळ वातावरण हाेते. गेल्या काही दिवसांपासून ४३ अंशांपर्यंत तापमान गेले हाेते.

लोहा, कंधार, देगलूर येथे तुरळक पाऊस
नांदेड- जिल्ह्यात बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहिली. शहरात कमाल तापमान ४४ से. नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. दुपारनंतर मात्र वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण झाल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली. कंधार येथे सायंकाळी पाचच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने १० मिनिटे हजेरी लावली. लोहा येथेही तुरळक पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळी सहाच्या सुमाराला वादळी वारे वाहू लागले. उन्हाने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.