आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात तीन दिवसांत पडला ८०.८२ मिमी पाऊस, दोन मुलींचा बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवेच्या कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन मराठवाड्यात तीन दिवसांपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तीन दिवसांत ८०.८२ मिमी पाऊस पडल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. पावसाच्या पुनरागमनाने राज्यात १४४ लाख व मराठवाड्यातील ४७ लाख हेक्टरवरील खरीप पिकांना जीवदान मिळाले असून ७० लाख हेक्टरवर रब्बी पेरणीसाठी फायदेशीर ठरले आहे. परतीचा पाऊस आणखी एक आठवडा टिकून राहण्याची शक्यता असून या काळात सर्वत्र जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाड्यात गुरुवारी २३.२०, शुक्रवारी ३२.१४ आणि शनिवारी २५.४६ मिमी सरासरी पाऊस पडला आहे. दरम्यान, तीन दिवसांमध्ये केज-कळंब भागात पाऊस पडल्यामुळे मांजरा धरणात पाणी येण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी धरणात ४ दलघमी पाणी आल्याने लातूर पालिकेने धरणावरून पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्याची तयारी सुरू केली.
दोन मुलींचा बुडून मृत्यू
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील शिवणी लख शिवारात शनिवारी दुपारी दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघी जनावरे चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. रोडच्या कडेला खड्ड्यात पाय घसरून पडल्याने दोघींचाही मृत्यू झाला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, नदीच्या पुरात दोघे वाहून गेले...
बातम्या आणखी आहेत...