आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्‍या हलक्‍या सरी, वारावावधनाने वीज गुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादेत संध्‍याकाळी दाटून आलेले ढग. - Divya Marathi
औरंगाबादेत संध्‍याकाळी दाटून आलेले ढग.
औरंगाबाद- सोमवारी औरंगाबाद, हिंगोली, नांदेड या ठिकाणी पावसाच्‍या हलक्‍या सरी कोसळल्‍या. हिंगोलीमध्‍ये दुपारी साधारण 15 मिनिटे पाऊस पडला. तर औरंगाबादमध्‍ये संध्‍याकाळी ढग दाटून आले होते व जोराचा वाराही सुटला होता. 9 वाजेच्‍या दरम्‍यान शहरात हलक्‍या सरी कोसळल्‍या. जालना व लातूरमध्‍ये वारे सुटल्‍यामुळे वातावरणातील उकाडा काहीसा कमी झाला होता. येथे मात्र पाऊस अद्याप पाऊस पडला नाही.
 
हलक्‍याशा सरीने वीज गुल
केवळ काही मिनिटांच्‍याच वारावावधनाने औरंगाबाद, हिंगोली तसेच जालन्‍यामध्‍ये अनेक ठिकाणी बत्‍ती गुल झाली. मात्र उकाड्यापासून हैराण नागरिकांना पावसाच्‍या हलक्‍या सरींने किंचीतसा दिलासा मिळाला.
 
 
बातम्या आणखी आहेत...