आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उस्मानाबाद - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू असून चोवीस तासांत 120.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने उस्मानाबाद तालुक्यातील काही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. शुक्रवारच्या पावसाने शहरातून जाणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, कळंब, वाशी, भूम, परंडा, लोहारा, तुळजापूर, उमरगा तालुक्यांतही शुक्रवारी दिवसभर रिमझिम सुरू होती. भिजपावसाने भूजल पातळीमध्ये वाढ होण्यास मदत झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील 59 टँकर बंद झाले आहेत.
गेल्या शनिवारपासून समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील काही भागात पाऊस नसल्याने खरिपाची पेरणी खोळंबली होती. काही भागात पेरणीचे दुबार संकट कोसळण्याची भीती बळीराजा व्यक्त करीत होता. मात्र, पावसाने उस्मानाबादसह अन्य तालुक्यांतही हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. काही भागात रखडलेली पेरणी पूर्ण होण्याची शक्यता असून पाण्याचे संकटही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या 15 दिवसांत ग्रामीण भागातील 59 टँकर बंद करण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.