आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजांच्या कडकडाटासह मुखेडला तास वादळी पावसाने झोडपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावरील खोलगट भागात पाण्याचे डबके साचले होते - Divya Marathi
रस्त्यावरील खोलगट भागात पाण्याचे डबके साचले होते
नांदेड - जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. मुखेड येथे दुपारी साडेतीननंतर दोन तास वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या काही भागांत मोठे वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांवरचे पत्रे उडाले. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली.

नायगाव, नरसी येथेही सायंकाळी वाजेच्या सुमाराला वादळी पावसाने हजेरी लावली. या भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला नसला तरी वादळी वारे जोरात सुरू होते. शहरातही सायंकाळच्या सुमाराला जोरदार वादळी वारे वाहत होते. ताशी ३२ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. वाऱ्यामुळे रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात उडाल्याने वाहनचालक त्रस्त झाले.

पूर्वेला कमी दाबाचा पट्टा
ओडिशाआणि कोलकाता भागात बुधवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यात बुधवारी दुपारनंतर वातावरणात बदल झाला. काही भागांत पावसाने हजेरी लावली. उपग्रहावरून मिळालेल्या छायाचित्रानुसार, येथे ४८ तास हे वातावरण कायम राहील. दोन दिवसांत मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस होईल. विदर्भात गारपीट होण्याची शक्यता असल्याचे एमजीएम खगोलशास्त्र अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. किनवट शहरातही बुधवारी सकाळी ते ८.३० वाजेच्या दरम्यान वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. देगलूर येथेही सायंकाळी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

वीज पडून एक ठार
कंधार तालुक्यातील महालिंगी गावात बुधवारी सायंकाळी पाच वाजता वीज पडून नरसिंग मारुती केंद्रे (४५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. १९९५ मध्ये अशाच दुर्घटनेत नरसिंग केंद्रे यांची पत्नी संगीता बहीण सत्यभामा केंद्रे यांचा वीज पडून मृत्यू झाला, अशी माहिती आनंद माधवराव गुट्टे यांनी दिली.

गायी दगावल्या
मुखेड तालुक्यात बुधवारी दुपारनंतर चांडोळा गावात अजय रामचंद्र पाटील यांच्या शेतात वीज पडून गायी एक वासरू दगावले, अशी माहिती तहसीलदार एस. पी. गोळे यांनी दिली. तालुक्यात वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक घरांवरचे पत्रे उडाले. तालुक्यात कोठेही गारपीट झाली नाही, असेही गोळे यांनी सांगितले.

नायगाव तालुक्यात गारा
नायगावतालुक्यातील गडगा, रातोळी, नावंदी या गावांत सायंकाळी हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती तहसीलदार व्ही.बी. मुंडे यांनी दिली. तालुक्यात जीवितहानी झाली नाही. मांजरम भागात वादळी पावसाने काही फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात अर्धा तास
बुधवारी सायंकाळी लातूर जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसा तापमान जवळपास ४० अंशांच्या घरात होते. त्यामुळे उकाडा जाणवत असताना सूर्य मावळताच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ पाऊस झाला.